अमरावती, संजय शेंडे, प्रतिनिधी : अमरावतीमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. पशुधन विकास अधिकाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. चेतन सोळंके असं आरोपीचं नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके वय 35 वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे. शहरातील अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती चेतन सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या. तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे. त्याने दीप्ती यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
आत्महत्येचा बनाव
अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीतील ही घटना आहे. आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली, आणि त्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. आधी दीप्ती यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करण्यात आले, त्यानंतर त्यांचा मृतदेहाला गळफास लावण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं खरं कारण समोर आल्यानंतर पती आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.