Explore

Search
Close this search box.

Search

December 4, 2024 11:16 am

MPC news

‘रवी राणांमुळे लोकसभेत नवनीत राणा पडणार’ निकालाआधीच बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा – News18 मराठी

kadu ranaअमरावीत, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. यादरम्यान राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. निवडणुकीनंतर प्रचाराच धुराळा आता शांत झाला आहे. अमरावती मतदारसंघ याला अपवाद ठरला आहे. कारण, मतदान झाल्यानंतरही प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेताना दिसत आहे. रवी राणा यांच्यामुळे नवनीत राणा पराभूत होतील, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केले आहे.

सार्वजनिक जीवनात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगले आहेत. तर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणांच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेय ही रवी राणांना जाईल, असेही बच्चू कडू म्हणाले. एकट्या रवी राणामुळे आम्ही निवडणुकीमध्ये उभे राहिलो असं नाही, निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ह्या स्लोगनला आम्हाला समोर न्यायचं होतं. अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे? आम्ही कशी बाजी पलटवू शकतो, ती अजूनही मतपेटीमध्ये बंद आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

लहान मुलांना जरी विचारलं तरी तोही सांगेल नवनीत राणा यावेळी पडणार आहे. आणि आमदार रवी राणाच त्यांना पाडणार आहे, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते पडणार आहेत. रवी राणा यांनी दोन वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी तरी निकाल वेगळा राहिला असता, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केला.

वाचा –
परळीत पुन्हा मतदान घ्या, पुरावे पाठवले तरी कारवाई नाही; पवारांचे निवडणूक आयोगावर आरोप

अमरावतीत तिरंगी लढत
नवनीत राणा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. निवडणूक जिंकल्यानंतर नवनीत राणा यांना भाजपला पाठिंबा दिला. आता यावेळी त्या भाजपच्या तिकीटावर लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिलीय. तर प्रहारकडून दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे उमेदवार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर