एमपीसी न्यूज- योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात(Alandi) साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते, याचीच जाणीव ठेवून प्रतिवर्षी प्रमाणे आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मोठ्या उत्साहात योगदिन(Alandi) साजरा केला.
श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इयत्ता 1 ली ते 4 थी चे सर्व विद्यार्थी सहभागी होते. योगदिनाची सुरुवात माऊलींच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर उपस्थित होते. सर्वप्रथम ज्येष्ठ शिक्षिका काळे वर्षा यांनी सर्व विद्यार्थ्यांना मानवी जीवनात असलेले योगाचे महत्त्व सांगितले, तसेच आज 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याची माहितीही दिली. आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आज वटपौर्णिमा देखील असल्याने त्याचेही महत्त्व सांगितले.
संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी योग ही आपल्या भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग हा फक्त आजच्या दिवसा पुरता न करता तो वर्षभरच करत राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना योगियांचा राजा म्हणून आपण शरीर व मन दोन्हीही निरोगी ठेवण्यासाठी शालेय अभ्यासाबरोबरच योगही केला पाहिजे.
श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक काळे सर यांनी श्वसनाच्या प्रात्यक्षिकांनी योगासनांची सुरुवात केली, नंतर सूर्याची 12 नावे सांगून सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. योगदिनाचे सर्व नियोजन कांबळे निशा यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शेळके वैशाली, भालेराव प्रतिभा, चव्हाण राहुल या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.