Explore

Search
Close this search box.

Search

March 25, 2025 3:16 pm

MPC news

Chinchwad : वाल्हेकरवाडीतील शाळेत शिक्षकांची कमतरता

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडीतील महापालिकेच्या मुलांच्या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. रिक्त जागांवर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शिवसेनेच्या(Chinchwad) वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला उपशहर संघटिका ज्योती संदीप भालके यांनी प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख संदीप भालके उपशहर प्रमुख हरेश नखाते, उपशहर संघटिका रजनी वाघ, रहाटणी विभाग प्रमुख गोरख पाटील, चिंचवड विभाग प्रमुख किरण दळवी उपस्थित होते.

वाल्हेकरवाडी शाळेमध्ये पहिली ते पाचवीची पटसंख्या 350 आहे. तर सहावी ते सातवीचा पट 140 आहे. यानुसार शाळेमध्ये 14 शिक्षकांची आवश्यकता आहे. पटसंख्येनुसार शाळेला अजून 4 उपशिक्षक व 3 पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. तसेच, मुख्याध्यापिका देखील एक महिन्याने निवृत्त होणार आहेत. मुलांच्या सुट्या संपून शाळा चालू झालेली आहेत, तरी अद्याप शिक्षकांची नेमणूक झालेली नाही.

Pune : पुणे पोलिसांच्या अटकेत असणारा आरोपीने लॉकअप मधून धूम ठोकली;कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाल्हेकरवाडीतील शाळेतील मुलांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच,पुढील 15 दिवसात जर शिक्षकांची नियुक्ती झाली नाही, तर शाळेसमोर ठिय्या आंदोलन करू असा निवेदनाद्वारे इशारा  दिला आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर