एमपीसी न्यूज – पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून परिचयास असले तरी आता शहराची ओळख बदलत असताना दिसत आहे. पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा(Drug News) चर्चेत आहे.
या प्रकरणावर पोलीस आयुक्त संदिप गिल यांनी माहिती दिली आहे की, काल (दि.23 जून) रोजी रात्री पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या एल 3 नावाचा बार दिलेल्या वेळेपेक्षा अधिक चालू होता. या बारच्या दोन मालकांनी तो तीन जणांना चालविण्यास दिला होता. एका इव्हेंट मॅनेजर ने 40 ते 50 लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली होती. हॉटेल मालकांनी रात्री 1.30 वाजता या बारचे मुख्य प्रवेश द्वार बंद केले आणि दुसऱ्या गेटने तिथे आत जाण्याची परवानगी दिली. शिवाजीनगर पोलिसांनी एल ३ बार सील केला असून यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे.
Pune : पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री; कायदा आणि सुव्यवस्था टांगली वेशीला
तसेच, जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पदार्थ कोणता आहे हे अमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे.शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केलं आहे.