एमपीसी न्यूज -“भारतीय समस्यांसाठी भारतीय उपाय आणि भारतीय सृजनशीलतेसाठी भारतीय माहिती संकलन आमचा स्पेक्ट्रम म्हणून, आणि अगदी मानवी वैशिष्ट्ये सुद्धा उर्वरित जगापेक्षा निराळी आहेत,” असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विज्ञान भारती (ViBha) च्या 6 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला एमआयटी- एडीटी विद्यापीठ इथे संबोधित करताना सांगितले.
पारंपारिक ज्ञान ही आमची अनन्यसाधारण संपत्ती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दोन्ही जगतातील सर्वोत्तम गोष्टी मिळवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ‘पारंपरिक ज्ञान अंकेक्षित ग्रंथालय’ सुरू केले आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. प्राचीन औषधांबद्दल पूर्वग्रह असलेल्या लोकांना कोविड काळात त्यांचे मत बदलावे लागले असेही त्यांनी नमूद केले. तथाकथित प्रगत देशांमधील लोक महामारीच्या काळात कोणत्याही आयुर्वेदिक उपचारासाठी किंवा उपचारांसाठी आपल्यापर्यंत पोहोचायचे असेही त्यांनी सांगितले.
“पारंपरिक ज्ञान ही आमची अनन्यसाधारण संपत्ती आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दोन्ही जगतातील सर्वोत्तम गोष्टी मिळवण्यासाठी ‘पारंपरिक ज्ञान अंकेक्षित ग्रंथालय’ सुरू केले आहे” डॉ सिंह
“2014 पासून पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आम्हाला मुबलक पाठिंबा मिळाला आहे आणि आम्ही मांडलेल्या कोणत्याही सकारात्मक सूचनांचे नेहमीच स्वागत केले गेले.” असे डॉ जितेंद्र सिंह यांनी गेल्या दशकातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीवर प्रकाश टाकताना सांगितले. भारत हे आघाडीचे राष्ट्र बनल्याचे तथाकथित विकसित राष्ट्रांनी मान्य केले आहे असे ते पुढे म्हणाले.
Drug News : पुण्यातील एफ.सी. रोडवरील बार सील,अनेकजण ताब्यात, बीट मार्शलला केले निलंबित
भारताची वैज्ञानिक क्रांती 2014 मध्ये 350 स्टार्टअप्सवरून 2024 मध्ये जवळपास 1.5 लाख झाली आहे यावर भर देत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की “आंतरराष्ट्रीय प्रमाणकांची पूर्तता करून भारताने स्वत:चे असे मानकही प्रस्थापित केले आहे.” जागतिक स्टार्टअपमध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे जगाला अवगत झाले आहे असे त्यांनी सांगितले. नवोन्मेष तसेच संशोधन आणि विकास उपक्रमांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की जागतिक सृजनशीलता निर्देशांकात भारत 2014 मधील 81 व्या स्थानावरून 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. विज्ञानात सर्वाधिक पीएचडी करणाऱ्यांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत, असे त्यांनी सांगितले.
विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने आम्हाला पुराव्यानिशी बोलायला शिकवले जाते आणि भारतीयत्वावरील आमचा विश्वास हा केवळ राष्ट्रीय अभिमान नसून तो सुयोग्य वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे,” असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी युवा वैज्ञानिक समुदायासोबत बौद्धिक चर्चा करताना स्पष्ट केले. सांस्कृतिक तसेच भांडवली संसाधनांसह पूरक सामूहिक प्रयत्नांनी सार्वजनिक-खासगी क्षेत्रात एकत्रित काम करावे अशा शब्दात त्यांनी युवकांना प्रोत्साहित केले.
विज्ञान भारतीने विज्ञान विकासात महत्वाची भूमिका जारी ठेवल्याचे ते म्हणाले. डॉ सतीश रेड्डी डीआरडीओचे माजी अध्यक्ष,डॉ,विजय भटकर, माजी अध्यक्ष,डॉ शेखर मांडे, अध्यक्ष, विभा, स्वामी श्रीकांतानंद महाराज, अध्यक्ष, रामकृष्ण मठ, पुणे, प्रा.विश्वनाथ कराड, अध्यक्ष, एमआयटी, पुणे यावेळी उपस्थित होते.