Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 6:43 am

MPC news

Tata Elxsi Dividend : टाटा इलेक्सी कंपनी गुंतवणूकदारांना देणार प्रती शेअर 70 रुपयांचा लाभांश

एमपीसी न्यूज – टाटा समूहाच्या टाटा इलेक्सी कंपनीने गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे.टाटा इलेक्सी कंपनीच्या  शेअरधारकांना प्रती शेअर 70 रुपये लाभांश (Tata Elxsi Dividend) देणार आहे. मंगळवारी (दि. 25) याचे गुंतवणूकदारांना वितरण होणार आहे. कंपनीने दिलेला हा आजवरचा सर्वाधिक लाभांश आहे.

टाटा इलेक्सी या कंपनीच्या शेअरची किंमत आज (सोमवारी, दि. 24) 7120 रुपये होती. जानेवारी  2008 मध्ये कंपनी शेअर बाजारात आली. ही कंपनी हेल्थकेअर, कम्युनिकेशन, ऑटोमोटिव्ह, बॉडकास्ट आदींसाठी तंत्रज्ञान आणि डिझाईन देण्याचे काम (Tata Elxsi Dividend)करते.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 2.32 टक्क्यांनी घट झाली. चालू आर्थिक वर्षात कंपनी चांगल्या स्थितीत काम करत असून कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर करत आनंदवार्ता दिली आहे.

Pimpri : तुकोबाराय व सावरकरांनी समाजाला देशरक्षण व धर्मरक्षणाची प्रेरणा दिली – शिरीष महाराज मोरे

मागील वर्षी कंपनीने 60.6 रुपये प्रती शेअर लाभांश दिला होता. तर सन 2022 मध्ये 42.5 रुपये लाभांश दिला होता. दरवर्षी कंपनी लाभांश रकमेत वाढ करत आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर