Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 6:41 am

MPC news

YCM: अन् स्नेहलला मिळाला कान; वायसीएम रुग्णालयात कान प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात कानाशी संबंधित एक महत्वाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. एका लहान मुलीला जन्मजात कान नसल्याने तिच्यावर कानाची प्लास्टिक सर्जरी(YCM) करण्यात आली.

चिखली येथे राहणारी स्नेहल मेहेर हिला जन्मजात एक कान नसल्याने तिला समाजात वावरताना आपल्याला एक कान नसल्याची उणीव सतत भासत होती. तिच्या पालकांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांची भेट घेऊन याबाबत उपाय विचारला असता त्यांनी(YCM) शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली.

सर्व चाचण्या झाल्यानंतर स्नेहलच्या कानाची वायसीएम रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. प्रा. डॉ. बालाजी धायगुडे यांच्या टीमच्या अथक प्रयत्नामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. अनेक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे तिला कानासारखा महत्त्वाचा अवयव परत मिळाला.

PCMC :पावसामुळे पाणी साचल्यास तात्काळ कळवा; महापालिकेचे आवाहन

सर्वसाधारणपणे सरकारी दवाखान्यामध्ये योग्य उपचार मिळत नसल्याचा चुकीचा समज पूर्णपणे बदलल्याचे स्नेहलच्या आईने सांगितले. यावेळी स्नेहलच्या आई-वडिलांनी डॉक्टरांच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले.

शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे, डॉ. बालाजी धायगुडे, डॉ. दीपक पाटील, डॉ. राहुल निकम, डॉ. रत्नदीप सोनवणे, डॉ. फेबिन साहजी, डॉ. प्रीती शहा, स्वप्नील पाटील, डॉ. ईशा भुजबळ, डॉ. राहुल निकम, डॉ. रत्नदीप सोनवणे, डॉ. फेबीन साहजी, डॉ. प्रीत शहा, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. ईशा भुजबळ, भूलतज्ञ मारुती गायकवाड, डॉ. जितेंद्र वाघमारे, डॉ. मनोज गजभारे, डॉ. हर्षा नारखेडे, डॉ. मनीषा सपाटे यांनी परिश्रम घेतले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल राहुल चौधरी, महेश सुरवसे, शिवाजी अंबिके, स्नेहलची आई सुषमा मेहेर यांनी सर्व डॉक्टरांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला.

 

 

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर