एमपीसी न्यूज – भरधाव वेगाने दुचाकी चालवून (Kiwale) रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.25) रात्री किवळे येथे घडला आहे.
समाधान गणपत लंके (वय 24 रा नांदेड) असे मयत तरुणाचे नाव(Kiwale) आहे. याप्रकरणी अमोल अशोकराव पटाईत (वय 27 नांदेड ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Tathwade: कारची काच उघडी ठेवण्यात पडले महागात कारमधून एक लाखांचा फोन चोरीला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र समाधान हा त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी त्याचे दुचाकी नियंत्रण सुटले व त्याची दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन धडकली.
यामध्ये तो गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.