एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांत पुण्यातील पबमध्ये खुलेआम ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचे व्हीडिओ समोर आले होते. यानंतर पुण्यातील संस्कृतीविरोधात टीका झाली. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी दिना निमित्त याबाबत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
पुणे शहरात पब आणि बारमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणेकरांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन ठोसपणे काहीतरी केले पाहिजे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे .
यावेळी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले पुण्यातील बार आणि पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाय करण्याची गरज आहे . ते पुढे म्हणाले की , पुणे हे जगातील व्यवसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरातील एक शहर झालं की काय, अशी प्रतिमा निर्माण करणे आपण बंद केले पाहिजे.
प्रशासनाने त्यासाठी तात्पुरती कारवाई न करता सातत्याने कठोर कारवाई केली पाहिजे. यादृष्टीने दक्षता पथकात सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेतले पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून तीन किंवा सात दिवस दिवस पब आणि बार बंद करु, असे ठरवले पाहिजे.