एमपीसी न्यूज- सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.या आयोजित शिबिरात 39 रक्तदात्यांनी(Talegaon Dabhade) रक्तदान केले.
सहकारमहर्षी माऊली दाभाडे यांनी सन 1987 साली पतसंस्थेची स्थापना केली आहे. या पतसंस्थेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा चेअरमन सुनील दाभाडे व विद्या दाभाडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले(Talegaon Dabhade) होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी चेअरमन सुनील दाभाडे, व्हॉ.चेअरमन बाळासाहेब महादू दाभाडे, संचालक बजरंग जाधव, प्रमोद गायकवाड, रमेश दाभाडे, बाळासाहेब राजाराम दाभाडे,रमेश गिरी,प्रकाश वाघ, सविता दाभाडे,सारिका दाभाडे, साहेबराव दाभाडे, नामदेव बाबुराव दाभाडे,गोरख दाभाडे,सुरेश गायकवाड, मुख्य व्यवस्थापिका रुपाली विनोद दाभाडे, सहसभासद वर्गणीदार व कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते.
या ठिकाणी लाईफ लाईन ब्लड सेंटर संस्थेच्याकडून डॉ. दीपचंद्र राजवंश व जनसंपर्क अधिकारी प्रवीण नवले यांच्या उपस्थितीमध्ये सर्व स्टाफ व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करताना विशेष सहकार्य केले.
संस्थेच्या आत्तापर्यंतच्या प्रगतीसाठी सर्व सभासद हितचिंतक, ठेवीदार,संस्थेचे कर्मचारी,दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे संस्थेचा प्रगतीचा आलेख वाढत असल्याचे मत सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी व्यक्त केले. स्वागत बजरंग जाधव यांनी केले. सूत्रसंचालन रूपाली दाभाडे तर आभारप्रदर्शन बाळासाहेब दाभाडे यांनी केले.