एमपीसी न्यूज – देहू येथून तुकाराम महाराजांची तर आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करते. पालखी सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. गर्दीचा फायदा घेऊन काहीजण चोऱ्यामाऱ्या करतात. इतर जिल्ह्यातील चोरट्यांचाही सहभाग असतो. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यावर्षी अधिक सतर्कता बाळगली(Dehu-Alandi Palkhi) आहे.
पालखीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. दर्शन घेण्याच्या घाईत अनेकांना आपल्या मोबाईल, रोख रक्कम, दागिन्यांचे भान राहत नाही. याचाच फायदा घेऊन चोरटे अलगदपणे दागिने, मोबाईल, रोख रक्कम चोरून नेतात. मागील वर्षी असे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे यावर्षी पालखीला व मार्गावर देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
वारकऱ्यांच्या वेशभूषेत पोलीस
खाकी वर्दीत, साध्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत देखील पोलीस पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पायी वारीदरम्यान चोऱ्यामाऱ्या, सोनसाखळी चोरी, खिसे कापण्याचे प्रकार यावर वारकऱ्यांच्या वेशातील पोलीस नजर(Dehu-Alandi Palkhi) ठेवणार आहेत.
Hinjawadi : वाहनावर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
साध्या वेशातील ‘वाॅचर’
पालखी सोहळ्यात विविध जिल्ह्यातील चोरटे सहभागी होतात. वारी दरम्यान चोऱ्यामाऱ्या करतात. यंदा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या गुन्हेगारांवर संबंधित शहरातील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मागील वर्षी ज्या भागातील गुन्हेगारांनी पालखी सोहळ्यात गुन्हे केले, त्या भागातील अनुभवी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके पालखी सोहळ्यासाठी मागवली आहेत. ही पथके आपापल्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉचर’ बनून नजर ठेवत आहेत.