Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 6:52 pm

MPC news

Ashadhi Wari : संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान, संपूर्ण वेळापत्रक

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हे यंदाचे 339 वे वर्ष आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज (शुक्रवार 28 जून) देहूतून होईल.

शनिवार 29 जून रोजी ही पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचेल इथे पालखीचा पहिला मुक्काम असेल. रविवार 30 जून रोजी पिंपरी कासारवाडी मार्गे पुण्यात दाखल होईल. 1 जून पर्यंत तुकोबाच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील नानापेठेतील श्री निवडूंग विठ्ठल मंदिरात राहील. 2 जुलै रोजी पालखी पुण्याहून लोणी काळभोर मार्गे कदम चाक वस्ती येथे मुक्कामाला थांबेल. 3 जुलै रोजी यवत येथील भैरवनाथ मंदिरात पालखी असेल.

गुरुवार 4 जुलै रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात तर 5 जुलै रोजी उंडवडी येथे पालखीचा मुक्काम राहील. 6 जुलै रोजी बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम असेल. 8 जुलै रोजी सणसर बेलवाडी येथे मुक्काम राहील. 9 जुलै रोजी रात्री अंथुर्णे येथे पालखी मुक्कामाला थांबेल. 10 जुलै रोजी निमगाव केतकी येथे पालखीचा मुक्काम राहील. 12 जुलै रोजी सकाळी सराटी येथे निरा स्नान करून पालखी अकलूजकडे रवाना होईल. 13 जुलै रोजी माळीनगर मार्गे जाईल आणि बोरगाव येथे मुक्काम राहील. 14 जुलै रोजी तोंडले बोंडाळे मार्गे पिराची कुरोली येथे मुक्काम असेल. 16 जुलै रोजी वाखरी येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

Click here to Subscribe MPC News India YouTube Channel 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर