एमपीसी न्यूज – केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (Dehuroad)वारकऱ्यांना देहूरोड येथे माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय यादव ,उपप्राचार्य सविता नाणेकर ,पर्यवेक्षिका विभावरी अभंग उपस्थित होते.
श्री. शिवाजी विद्यालय शाखेतील स्काऊट आणि गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान निमित्त पंढरपूर वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांना नवभारत साक्षरता अभियान योजनेची ठळक वैशिष्ट्ये असलेल्या माहितीपत्रकांचे वाटप साक्षरता विषयक घोषणा देत देहू फाट्याजवळ करण्यात आले.
गेले सांगून ज्ञाना-तुका,
झाला उशीर तरीही शिका…!
अज्ञानात आपली अधोगती,
शिकण्यातच आहे खरी प्रगती…!
शिक्षण ही एक मजबूत शिडी,
जेणेकरून पुढे जाईल पिढी…!
साक्षरतेचा दिवा,
घरोघरी लावा…!
जनजन साक्षर…!
साक्षरतेकडून समृद्धीकडे…!
अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील स्काऊटर निलेश मानकर, गाईडर मनीषा कठाळे, वैशाली उगले,अरुण डिंबळे, मिलिंद शेलार, योगेश परदेशी,वाल्हू गांगुर्डे, विवेक ढेरे, ज्ञानेश्वर मराडे, निलेश टिळेकर यांनी केले.