एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्यासाठी(Dehugaon) आलेल्या महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास देहूगाव येथे घडली.
सुनंदा सचिन भोसले (वय 22, रा. फुके वस्ती, जिवरग टाकळी, (Dehugaon)ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. गौळण उत्तम तेलंग (वय 50, रा. शिक्षक कॉलनी, उदगिर, जि. लातुर) यांनी शुक्रवारी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनंदा भोसले हिच्यासह तिच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangvi : पिंपळे गुरवमध्ये फेब्रिकेशन दुकानाला आग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी गौळण या प्रसाद घेण्यासाठी देहूगाव येथील भैरवनाथ चौकात उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी सुनंदा हिने गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या अंगावरील 12 हजार रुपये किंमतीचे 03 ग्रॅम वजनाचे गंठणचे पदक कट करून चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.