एमपीसी न्यूज – संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 30) सकाळी आंबा स्टॉप, अलंकापुरम चौक आणि देहू फाटा येथे करण्यात (Alandi)आली.
भगवान वसंत गायकवाड (वय 30, रा. खडकपुरा, ता. जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तुषार विश्वनाथ काकडे (वय 44, रा. अलंकापुरम सोसायटी, हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आंबा स्टॉप, अलंकापुरम चौक येथे आरोपीने फिर्यादी काकडे यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावली. त्यानंतर देहू फाटा, आळंदी येथे समीर अनिलराव चंदूरवार यांची 13 ग्रॅम वजनाची 39 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. पोलिसांनी या भामट्या चोरट्याला अटक(Alandi) केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.