एमपीसी न्यूज – ‘भूगोल विषयामध्मये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर’ या विषयावर डॉ. मनोजकुमार देवणे यांचे व्याख्यान होणार आहे. हे विशेष व्याख्यान सोमवारी (दि. 1) सायंकाळी 5:30 वाजता सायन्स पार्क, चिंचवड येथे होणार(Chinchwad) आहे.
Tamhini ghat : ताम्हिणी घाटात तरुण गेला वाहून; घटनेचा व्हिडीओ आला समोर
डॉ. मनोजकुमार देवणे हे पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्राध्यापक असून त्यांना शिक्षण क्षेत्रात 29 वर्षांचा असा दीर्घ अनुभव आहे. सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. यामुळे ज्ञानाच्या कक्षा आणखी जास्त प्रमाणात विस्तारल्या आहेत. भूगोल या महत्वाच्या विषयात देखील याचा वापर होऊ लागला आहे.मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाने या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. भूगोल हा अनेकांसाठी रटाळ विषय असतो. हा रटाळपणा दूर करण्यासाठी भूगोलातील नवनवीन माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याबाबत डॉ. देवणे(Chinchwad) मार्गदर्शन करणार आहेत. भूगोल सारख्या महत्त्वाच्या विषयात रस असणाऱ्यांनी नक्की व्याख्यानास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.