Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 5:54 am

MPC news

LPG Price : व्यावसायिक LPG सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त

एमपीसी न्यूज – व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (LPG Price) आजपासून (सोमवार) 30 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एलपीजी सिलेंडरचे दर 30 ते 31 रुपयांनी स्वस्त झाले असून आज 1 जुलैपासून लागू केले जाणार आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये झालेली घट ही 19 किलोंच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये करण्यात आलेली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र, कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या घटलेल्या दरांचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना होणार आहे.

मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1598 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1629 रुपये होती. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1646 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1676 रुपये प्रति सिलेंडर होती. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1756 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1787 रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1809.50 रुपये झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1840.50 रुपये प्रति सिलेंडर होती.

Nigdi : जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे मुख्यमंत्र्यांनी केले सारथ्य

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती ‘स्थिर’

घरगुती 14.2 किलोग्राम एलपीजी सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एलपीजी सिलेंडरचे पूर्वीचेच दर स्थिर आहेत.

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत निश्चित करतात. 1 जून 2023 रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी 200 रुपयांचा दिलासा मिळाला आणि किंमत 903 रुपये झाली. 9 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर