एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने दोन तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघ व मुंबई शिक्षक मतदारसंघातील जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सरशी झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपने स्वतःकडे राखला आहे तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी 26 हजार 26 मतांनी विजय मिळवला तर मुंबई शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे. अभ्यंकर यांनी 4 हजार 83 मतांनी विजयश्री खेचून आणली आहे.
Mahalunge : महाळुंगे एमआयडीसीमध्ये सराईत गुंडाचा खून
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं. पण, अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला.
कोकण पदवीधरमध्ये सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचा मान भाजपच्या निरंजन डावखरे यांच्या नावावर नोंद झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.
Please click here to subscribe MPC News India YouTube Channel