Explore

Search
Close this search box.

Search

March 25, 2025 2:46 pm

MPC news

Monsoon session : पुणे शहराला वीस टीएमसीपेक्षा जास्त पाणी मिळणे आवश्यक – आमदार मिसाळ

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण व्हायचे आहे. महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश झाला आहे. शिक्षण आणि आयटी व्यवसायामुळे लोकसंख्येत वाढ होत असून सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमधून जवळपास  20 टक्के पाणी गळती होते म्हणून पुणे शहराला वीस टीएमसीपेक्षा जास्त पाणी मिळणे(Monsoon session) आवश्यक आहे, असे सांगत पुणे शहरातील पाणीटंचाईबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी शासनाचे लक्ष वेधले.

 

तसेच, शहरात अतिरिक्त पाण्याचा वापर केला म्हणून शासनाने दंड केला आहे. शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी द्यावे. याव्यतिरिक्त कात्रज येथे लघु पाटबंधारे आणि महापालिकेने सर्वेक्षण केले असून अर्धा टीएमसी पाणी पुणे शहराला उपलब्ध होऊ शकते असेही मिसाळ म्हणाल्या.

 

यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिरिक्त पाणी वापराबद्दल कायद्याला धरूनच शासनाने दंड केला आहे. मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत लवादाच्या निर्णयानुसार कार्यवाही करू. भिलारेवाडी, कात्रज येथे अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होत असेल तर ते घेणे शक्य आहे का, यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाला तातडीने सर्वेक्षण करण्यास सांगून कार्यवाही करण्यास(Monsoon session) सांगता येईल.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर