एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या पहिल्याच बॅचने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे.स्कूलचा अथर्व माने जिल्हा गुणवत्ता यादीत चमकला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. पाचवीचा निकाल महाराष्ट्र शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला असून अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे एकूण 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून देहू केंद्रातून अभंग इंग्लिश मिडीयम स्कुलचा कु. अथर्व प्रशांत माने हा एकमेव विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरला असून हवेली तालुका ग्रामीण विभागातून एकूण 32 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. अथर्व माने या विद्यार्थ्याने तालुका गुणवत्ता यादीत 15 वे तर जिल्हा गुणवत्ता यादीत 489 वे स्थान पटकावले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्यास सृजन फाउंडेशनच्यावतीने वै. दशरथ बाळासाहेब कंद यांच्या स्मरणार्थ रुपये 5 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
Welcome Team India : भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर जगजेत्त्यांना साजेशे जंगी स्वागत
शाळेतील निशा हिंगे, स्नेहल शिंदे, सुजाता माने, वृषाली आढाव, रेखा अडागळे, आश्रफ शेख, कल्याणी खोत, सिद्धेश भिसे या शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तासिका घेऊन वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच किशोर हांडे, प्रमोद मोरे यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. सृजन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी तसेच शिक्षकवृंद यांच्याकडून अथर्व प्रशांत माने याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. शिष्यवृत्ती परिक्षेतील अथर्व माने याने संपादित केलेल्या यशाने अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.