एमपीसी न्यूज – पुणे शहरात सध्या झिका (वायरस) या रोगाची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. पुणे शहराच्या अनेक भागात या रोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारजे परिसरात औषध फवारणी करण्याची मागणी पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. सहाय्यक आयुक्त वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय(Pune) यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.
पावसाचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने मच्छरांच्या संख्येत वाढ होऊन डेंग्यूचे देखील प्रमाण तसेच रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहता माझ्या प्र. क्र. 32 वारजे माळवाडीमधील सर्व परिसरात व ज्या मोठमोठ्या रहिवासी सोसायटी आहेत त्यामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात या वायरास बाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सदर ठिकाणी वारंवार औषध फवारणी, धूरफवारणी व आवश्यक असणारी योग्य ती उपाययोजना करणे महत्वाचे आहे, जेणेकरून नागरिकांचे स्वास्थ व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या आरोग्य विभागामार्फत वारजे परिसरात व सदर सोसायटीमध्ये या रोगापासून काळजी घेण्यासाठी आवश्यक ती औषध फवारणी व इतर लागणारी सर्व उपाययोजना त्वरित करण्यात यावी, अशी विनंती पत्रात(Pune) करण्यात आली आहे.