Explore

Search
Close this search box.

Search

February 17, 2025 11:26 pm

MPC news

Bavdhan : तेल खरेदीच्या बहाण्याने योगा टिचरची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नुऱ्पुगा एक्स सोल्यूशन हे तेलखरेदी करण्याच्या बहाण्याने एका महिला योगा टिचरची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक(Bavdhan) केली आहे. ही फसवणूक 2 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत  बावधन येथे घडली आहे.

यावरून 52 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून डॉ. आर.सी, रिया कंपनी, ट्रॅक ऑन, कुमार एन्टरप्रायजेस कंपनी  व विविध मोबाईलधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : महापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नुऱ्पुगा एक्स सोल्यूशन(Bavdhan) नावाचे तेल खरेदीच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याशी आरोपींनी संपर्क साधला. व त्यांच्याकडून वेळोवेळी असे  एकूण 29 लाख 79 हजार 980 रुपये घेवून त्यांची फसवणूक केली आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर