एमपीसी न्यूज – विश्वेश्वर बँकेच्या एमटीएम मधून चोरट्यांनी 50 हजार रुपये किंमतीच्या सहा बॅटर्या चोरून नेल्या. ही घटना 23 जून रोजी पहाटे पाच ते सहा वाजताच्या सुमारास घडली.
रुपेश दशरथ सोनसाळे (वय 41, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wakad : कॅब अडवून गाडीची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरी करीत असलेल्या विश्वेश्वर इडस्ट्रीजच्या आवारातून विश्वेश्वर बँकेच्या एटीएममधून 23 जून रोजी पहाटे पाच ते सहा वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रुपये किंमतीच्या सहा बॅटर्या चोरून नेल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.