Explore

Search
Close this search box.

Search

March 27, 2025 2:07 am

MPC news

Chikhali : शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवाया केल्या. यामध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तर याप्रकरणी गुरुवारी (दि. 4) गुन्ह्यांची(Chikhali) नोंद करण्यात आली(Chikhali) आहे. 

 

गुन्हे शाखा युनिट दोनने दिनेश पुखराज रेनवा (वय 28, रा. मोरवस्ती, चिखली) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार नामदेव कापसे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेवस्ती येथील साईबाबा मंदिराजवळ एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दिनेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

तळेगाव दाभाडे पोलिसांनी वतननगर येथून सुदर्शन सुदाम काशीद (वय 23, रा. इंदोरी, मावळ) याला अटक केली. त्याच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत(Chikhali) काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर