एमपीसी न्यूज – चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे. विठ्ठलवाडी, देहूगाव येथे देहूरोड पोलिसांनी ही(Dehuroad)कारवाई केली आहे.
रोहित विशाल सकटे (वय 22, रा. माळवाडी, देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी, देहूगाव येथे काही मुले चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे असलेल्या दुचाकिंबाबत चौकशी केली असता त्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील रोहित सकटे याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांनी आणखी चार दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन लाख 40 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.देहूरोड, चिखली, महाळुंगे एमआयडीसी, भोसरी, खडकी आणि चतुश्रुंगी पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार सुनील यादव, किशोर परदेशी, बाळासाहेब विधाते, बळीराम चव्हाण, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसीन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे(Dehuroad)यांनी केली.