एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. मुंबई वाहिनीवर नवीन बोगद्यामध्ये हा अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. शुक्रवारी (दि. 5) सकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई वाहिनीवर खोपोली हद्दीत नवीन बोगद्यामध्ये ट्रेलर कंटेनर (एमएच 43/सीई 3217), गॅस टँकर (एमएच 04/एचडी 9198) आणि कार वाहतूक करणारा कंटेनर (एनएल 01/एडी 3146) अशा तीन वाहनांची धडक(Expressway Accident) बसली.
या अपघातात गॅस टँकर चालक अक्षय व्यंकटराव ढेले (वय 30, रा. अहमदपूर कुमठा, जि. लातूर) हा टँकरमध्ये अडकला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कार वाहतूक करणाऱ्या कंटेनर वरील चालक अपघात घडल्यानंतर घटनास्थळावरून पळवून गेला. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक(Expressway Accident) सुरळीत केली.