एमपीसी न्यूज – गर्दी आणि देणगी जमवण्याकरता आम्हाला टार्गेट देण्यात आले होते, अशी धक्कादायक कबुली हाथरस चेंगराचेंगरी (Hathras Stampede) प्रकरणी अटक केलेल्या सेवेदारांनी पोलिसांच्या चौकशीत दिली. त्यामुळे या दुर्घटनेमागील भयानक वास्तव समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरी (Hathras Stampede) दुर्घटनेत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तर, पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आयोजन समितीच्या सेवेदार आणि सदस्यांनी या कार्यक्रमाचे (Hathras Stampede) आयोजन केले होते. सत्संगसाठी गर्दी आणि देणगी गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती, असं त्यांनी पोलीस चौकशीत स्पष्ट केलं आहे.
लोखंडी कठडे लावून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत होते. कार्यक्रमस्थळी सूर्यप्रकाशाची व्यवस्था, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था, साफसफाई आदी सर्व कामे सेवेदार पाहत होते. या कार्यक्रमासाठी त्यांना गणवेशही देण्यात आले होते.
गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी महिला आणि पुरुषांना कमांडो सारखे काळे कपडे देण्यात आले होते. काही सेवेदारांना गुलाबी रंगाचा पोषाख दिला होता. भोले बाबांच्या पायाखालची माती कपाळावर लावल्यास अनेक समस्या दूर होतात, अशी समजूत त्यांच्या अनुयायांमध्ये असल्याचे सेवेदारांनी चौकशीत सांगितले.
Team India : टीम इंडियाचं मुंबईत भव्य स्वागत; मुंबईत विक्रमी गर्दी