एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीनजी वाहनांना प्रचंड मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचे पाहायला मिळते. त्यातच, आता बजाज ऑटोकडून जगातील पहिली सीएनजी बाईक (CNG Bike Launching) केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे लाँच करण्यात आली.
पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक (CNG Bike Launching) असून 2 किलो सीएनजीमध्ये आपण 200 किमी प्रवास करू शकतो. तर, 2 लीटर पेट्रोल आणि 2 किलो सीएनजीमध्ये जवळपास 330 किमीचा टप्पा गाठता येईल.
Dehuroad : देहूरोड पोलिसांनी चोरीच्या सहा दुचाकी पकडल्या; एकास अटक
पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांची मुक्तता होणार असून बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. या बाईकचे उद्घाटन (CNG Bike Launching) आज (दि.5 जुलै) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झाले. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळे दुचाकीस्वारांना बऱ्याच प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://x.com/nitin_gadkari/status/1809174009268838745
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, सीएनजी बाईकची (CNG Bike Launching) किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी ,जेणेकरून सामान्य माणसाला परवडेल. प्रदूषणमुक्त भारत करण्याचं माझं सर्वात मोठं ध्येय आहे. त्याअनुषंगाने सीएनजी बाईक या ध्येयाला नक्कीच हातभार लावेल यात तीळमात्र शंका नाही.
वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता. अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचलो आहोत याचा मला आनंद वाटतो. अमेरिका, चीन या देशानंतर आपला क्रमांक असून भारत देश वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय, असे गडकरी यांनी या बाईक लाँचिंग सोहळ्याप्रकरणी बोलताना म्हटले.