Explore

Search
Close this search box.

Search

March 27, 2025 2:55 am

MPC news

Pimpri : राजन लाखे यांचा ‘बकुळगंध’ विद्यापीठ अभ्यासक्रमात

एमपीसी न्यूज – नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला ( एफ. वाय. बी. ए.) वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी राजन लाखे यांचा शांता शेळके जन्म शताब्दी ग्रंथ –  बकुळगंध  समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या ग्रंथास संदर्भग्रंथ म्हणून मान्यता(Pimpri)दिली आहे.

Talegaon Dabhade:हभप ताराबाई वारींगे यांचे निधन

शान्ता शेळके यांच्या साहित्याशी निगडित असलेले तसेच त्यांच्याशी संबंधित असलेले, महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील 100 मान्यवरांनी त्यांच्या साहित्यावर केलेले भाष्य, त्यांनी सांगितलेल्या साहित्यिक आठवणी आणि मानवंदना म्हणून शांता शेळके शेळके यांना अर्पण केलेल्या त्यांच्याच कविता असा एकूण 100 मान्यवर, 100 साहित्यभाष्य, 100 आठवणी, 100 कवितांचा साहित्यठेवा असलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची निवड मराठी अभ्यास मंडळाने केली आहे. हा ग्रंथ शांता शेळके यांच्या साहित्यावर पी. एचडी. करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने राबवलेल्या प्रकल्पातून या ग्रंथाची निर्मिती झाली असून नुकतीच त्याची तिसरी आवृत्ती(Pimpri)प्रसिद्ध झाली आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर