Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 6:44 pm

MPC news

Property Tax : मिळकतधारकांचा ऑनलाइनकडे कल वाढला

एमपीसी न्यूज – महापालिकेकडे सहा लाख 30 हजारांवर मिळकतींची नोंद आहे. त्यातील तीन लाख 57 हजार 11 मिळकतधारकांनी एप्रिल ते जून कालावधीत अर्थात पहिल्या तिमाहीत 432 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. आतापर्यंत दोन लाख 62 हजार 522 म्हणजेच मिळकतकर भरलेल्या एकूण मिळकतधारकांपैकी 73 टक्के मिळकतधारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला(Property Tax) आहे.

Pimpri : राजन लाखे यांचा ‘बकुळगंध’ विद्यापीठ अभ्यासक्रमात

शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी आदी एकूण सहा लाख 30 हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नागरिकांनी मिळकतकर भरण्यासाठी महापालिका करसंकलन विभागाने विविध योजना राबविल्या. त्याचा यावर्षी आतापर्यंत 54 टक्के मिळकतधारकांनी लाभ घेतल्याचे मिळकतकर भरण्यावरून दिसते.

दरम्यान, मिळकतकराची बिले वितरणासाठी यावर्षीही महापालिकेने ‘सिद्धी’ प्रकल्प राबविला. म्हणजेच बचतगटांच्या माध्यमातून मिळकतधारकांना बिले वेळेत मिळाली. परिणामी, नागरिकांना 30 जूनपर्यंत जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ(Property Tax) घेता आला.

 

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर