मुंबईतील मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वसंत मोरे यांच्याबरोबर सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, युवासेना अधिकारी राम थरकुडे, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला माझ्या पक्षप्रवेशाचा फायदा होणार आहे. दक्षिण पुण्यात शिवसेना मजबूत करण्यावर आपला भर असेल. पुणे महापालिकेच्या 3 प्रभागावर आपले वर्चस्व आहे. 2017 मध्ये 3 प्रभागात 12 उमेदवार उभे केले होते. यामध्ये 1 ही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होऊ दिले नाही. मला स्वतःला 14 हजार मतदान झाले. बाकीच्या उमेदवारांना 8 हजार, 9 हजार, 7 हजार, 5 हजार मतदान झाले. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि महाविकास आघाडी मजबूत होणार असल्याचे वसंत मोरे(Pune) यांनी सांगितले.