एमपीसी न्यूज – वारंगवाडी (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील सौ ताराबाई बाळोबा वारींगे(वय 68) यांचे शुक्रवार (दि.5) सकाळी 11.30 वा आषाढी पायीवारी दिंडीमध्ये रोटीचा माळ, दौंड येथे पायी चालत असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने( Talegaon Dabhade) निधन झाले.
त्यांच्यामागे पती, दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.
हभप बाळोबा घमाजी वारींगे यांच्या पत्नी तर मावळ तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना पदाधिकारी व भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी संचालक मारूती वारींगे व उद्योजक लक्ष्मण वारींगे यांच्या त्या मातोश्री( Talegaon Dabhade) होत.