एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवर हेल्पर म्हणून काम करणाऱ्या मजुराचा 19 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना निंबाळकर नगर ताथवडे येथील कोहिनूर सफायर या बांधकाम साइटवर(Wakad)घडली.
प्रशांत बालाजी जमदाड (वय 17, रा बालाजी नगर, चाकण. मूळ रा. मुखेड, नांदेड) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, निंबाळकर नगर ताथवडे येथे कोहिनूर सफायर या बांधकाम साईटचे काम सुरू आहे. प्रशांत हा या ठिकाणी अगंद पंढरीनाथ घोडके (वय 34) यांच्यासोबत हेल्पर म्हणून एक दिवसासाठी कामावर आला होता. काम संपवून तो इमारतीमधून खाली उतरत असताना 19 व्या मजल्यावरून तो खाली पडला. त्याला उपचारासाठी औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.