एमपीसी न्यूज – स्टॉक मार्केटमध्ये फायदा मिळवून देण्याच्या आदेशाने एका तीस वर्षीय तरुणाची 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 8 मे 2024 ते 13 जून 2024 या कालावधीत भोसरी येथे घडला आहे.
याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरुणाने फिर्याद दिली असून विविध बँक खाते धारक व मोबाईल क्रमांक धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Alandi : आळंदीतील स्कूलबस अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी स्टॉक मार्केटमध्ये जाताना नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला व त्यांना पगार खात्यासाठी बँक अकाउंट काढायला लावून त्यामध्ये वेळोवेळी एकूण 25 लाख 75 रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.