एमपीसी न्यूज – स्वतःची कर्ज फेडण्यासाठी एकाने दुसऱ्या नागरिकाला (Pimpri)तब्बल पावणे तीन लाखांचा गंडा घातला होता. यासाठी ऑनलाईन पद्धतीने गुजरात तसे भारताच्या बाहेरून रॅकेट सुरू होते. या प्रकरणाचे पिंपरी चिंचवड सायबर सेल नी पोलखोल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला गुजरात मधून ताब्यात घेतले आहे.
निकुंज अश्विनभाई मकवाना (रा तरुडा , अमरेली सुरत, गुजरात) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने व्हाट्सअप ग्रुप द्वारे शेअर मार्केट मधून पैसा कमावून देण्याचे टिप्स देण्याच्या पाहण्याने पिंपरी चिंचवड येथील एका नागरिकाला तब्बल पावणेतीन लाखांचा गंड घातला होता. या व्हाट्सअप ग्रुपचा तपास करत असताना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेल यांना ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणारे एक रॅकेट हाती लागले. ज्यामध्ये गुजरात व भारता बाहेरून तब्बल चार कोटी 29 लाख 49 हजार रुपयांची उलाढाल करण्यात आली होती यामध्ये भारतभरातून या ग्रुप विरोधात 56 तक्रारी दाखल झाल्याचे देखील तपासात उघड केला आले आहे.
पुण्यामध्ये दाखल असलेले बँक अकाउंट व इतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे पिंपरी चिंचवड सायबर सेल पोलिसांनी संबंधित अकाउंट गुजराती मधील असल्याचे तपासात शोधले यावेळी पोलिसांनी गुजराती मधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी आरोपी श्री राधे इंटरप्राईजेस या नावाने अकाउंट असलेले समोर आले.
पोलिसांनी आरोपीकडे तपास केला असता आरोपीने त्याचे गुजरात मधील मित्र , दुसऱ्या राज्यातील मित्र तसे परदेशातील काही मित्र यांच्या मदतीने तो हे फसवणुकीचे काम करत होता आरोपी याच्यावर कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी इतरांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आतापर्यंत चार कोटी 29 लाख 49 हजार 558 रुपयांची उलाढाल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर सायबर सेल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सायबर सेल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर रवींद्र पन्हाळे, पोलीस हवालदार दीपक भोसले, पोलीस शिपाई अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, यांच्या पथकाने केली आहे.