एमपीसी न्यूज – वाहन अडवल्याच्या कारणावरून पुण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही धक्कादायक घटना शहरातील बुधवार चौकात शुक्रवारी (दि.5) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Zika Virus : झिकाच्या पार्श्वभूमीवर महापालिका करणार गर्भवती स्त्रियांची तपासणीला सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी बुधवार पेठ चौकात वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने एका वाहनाला चौकशीसाठी अडवले. यानंतर वाहनचालका ची महिला अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली. यावेळी आरोपीने महिला अधिकाऱ्यावर बाटलीतील पेट्रोल फेकले. परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले.
दरम्यान या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel