एमपीसी न्यूज- बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये गॅरेज डस्ट (Tathwade)मध्ये पडून एका 17 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) सायंकाळी ताथवडे येथील कोहिनूर सफायर फेज थ्री येथे घडली.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बालाजी जयवंत जंजाळ (वय 45 रा चाकण) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी रामराव उर्फ राम सुभाष काळे (वय 31 रा. तळेगाव) व इतर संबंधित यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगा हा फिर्यादी यांचा मुलगा होता. तो आरोपी राम याच्या हाताखाली काम करत होता. मात्र राम याने त्याच्या मजुरांसाठी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना न केल्याने फिर्यादी यांचा मुलगा गाराबेज डक्ट मध्ये खाली पडला व यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यावरून वाकड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.