Explore

Search
Close this search box.

Search

March 27, 2025 2:33 am

MPC news

Today’s Horoscope 6 July 2024 : आजचे राशीभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. आजचा दिवस – शनिवार. तारीख – 06 जुलै 2024 (Today’s Horoscope 6 July 2024)

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेला असेल.

आज नक्षत्र – पुनर्वसु

चंद्र राशी – मिथुन 22.35 पर्यंत नंतर कर्क.

—————————–

मेष- ( शुभ रंग- निळा) (Today’s Horoscope 6 July 2024)

आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी होऊ शकतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळावेत.

मिथुन (शुभ रंग – भगवा)

घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात, परंतु त्यांच्या शब्दाचा मान राखावा. आज काही खोटी आश्वासने देणारे मित्र भेटतील दुरूनच राम राम करा.

कर्क ( शुभ रंग- जांभळा)

आजचा दिवस धावपळीचा आहे. ऑफिस कामासाठी प्रवास घडण्याची शक्यता आहे. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घेणे गरजेचे.

सिंह ( शुभ रंग- चंदेरी)

आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. वास्तू वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकते, जिवलग मित्राकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल.

कन्या (शुभ रंग- डाळिंबी)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते.

MLA Sunil Shelke : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुटसुटीत ‘मावळ पॅटर्न’

तूळ (शुभ रंग- चंदेरी) (Today’s Horoscope 6 July 2024)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपून करायला हवा. उपासनेत मात्र खंड नको.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. संध्याकाळी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक जीवनात सुसंवाद असावा.

धनु (शुभ रंग- राखाडी)

आज आनंदी व उत्साही असा दिवस असून एखाद्या भागीदारीच्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तुम्ही काही योग्य निर्णय घेऊ शकाल.

मकर (शुभ रंग- मोरपंखी)

आज जे कराल ते तब्येतीला जपून करा. खाणे पिणे नियंत्रणात असू द्या. आज विश्रांतीही गरजेचे आहे मामा मावशी कडून काही महत्त्वाचे समाचार येतील.

कुंभ ( शुभ रंग- मरून)

आज तुम्हाला प्रकृती उत्तम साथ देईल. काही अनपेक्षित लाभ होतील. चैनी व विलासि वृत्ती बाळावेल. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वकांक्षा वाढतील.

मीन (शुभ रंग- गुलाबी)

आज कौटुंबिक स्तरावर काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. मुले आज्ञेत असतील. खर्च कितीही वाढला तरी पैशाची कमतरता भासणार नाही.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर