Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 8:41 am

MPC news

UK Election Result : ब्रिटनमध्ये 14 वर्षानंतर सत्तांतर, 412 जागा जिंकत किएर स्टार्मर नवे पंतप्रधान

विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा दारुण पराभव
एमपीसी न्यूज : ब्रिटनमध्ये लेबर पार्टीने 14 वर्षांनंतर सत्तांतर (UK Election Result) घडवून आणले आहे. किएर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या नेतृत्त्वातील लेबर पार्टीने 412 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे किएर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यांना केवळ 122 जागांवर समाधान मानावे लागले.
ब्रिटनच्या संसदेत 650 सदस्य आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 326 जागांची आवश्यकता असते. लेबर पार्टी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला.
किएर स्टार्मर यांच्यावर जगभरातील विविध राष्ट्रप्रमुखांकडून या विजयाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. लेबर पार्टीने (UK Election Result) 1997 नंतर पुन्हा एकदा चारशे जागांचा टप्पा पार केला आहे. लेबर पार्टीला 1997 मध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी पक्षाचे नेते टोनी ब्लेअर होते. पक्षानं त्यावेळी 419 जागा मिळवल्या होत्या. तर हुजूर पक्षाला 165 जागा मिळाल्या होत्या.

PCMC : आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनाबाहेरील नामफलकात आईच्या नावाचा समावेश

ब्रिटनचे मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या निवडणुकीत झालेला पराभव मान्य केला आहे. हुजूर पक्षाची या निवडणुकीत मोठी घसरण झाली. त्यांनी पराभवाची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्यांनी किएर स्टार्मर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
ऋषी सुनक यांनी उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थालर्टनमधून 47.5 टक्के मत मिळवत विजय मिळवला. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना वेस्ट नॉरफॉक मधून पराभव स्वीकारावा लागला. लिझ ट्रस यांनी सप्टेंबर 2022 मध्ये पंतप्रधान पद स्वीकारले होते. मात्र, पुढच्या सहा महिन्यांतच त्यांना राजीनामा देणे भाग पडले होते.
सार्वत्रिक निवडणुकीतील (UK Election Result) विजयानंतर किएर स्टार्मर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण करुन दाखवल्याचे त्यांनी बोलून दाखवले. आपण ज्यासाठी प्रचार केला, लढाई लढली, मतदान केले, आता त्याचा निकाल देखील आपल्या समोर आहे, असे किएर स्टार्मर म्हणाले. लेबर पार्टी ही देशसेवेसाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर