एमपीसी न्यूज – अपघात झाल्याने अपघातग्रस्त व्यक्ती कार चालकाला बोलत असताना(Bhosari) पीएमपी बस चालकाने कारला धडक देऊन अपघातग्रस्त व्यक्तीला जखमी केले. ही घटना 4 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता फिलिप्स चौकाजवळ, पिंपरी येथे घडली.
आनंद मारुती मोहिते (वय 31, रा. राजगुरूनगर, पुणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी बस (एमएच 14/एचयु 5541) चालक फिरोज अकबर खान (रा. बोपोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chinchwad : सांगवीतील घुटे टोळी, देहूरोड येथील मगर टोळी, तळेगाव दाभाडे येथील खराडे टोळीवर मोका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिते त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या पुढे जाणाऱ्या कार चालकाने खड्डा चुकविण्यासाठी कार डाव्या बाजूला घेतली. त्यामुळे मोहिते यांच्या दुचाकीची कारला धडक बसली. मोहिते यांनी कार चालकाला थांबवून त्याच्याशी बोलत असताना पाठीमागून भरधाव वेगात पीएमपी बस आली. बसने कारच्या दरवाजाला धडक देऊन मोहिते यांना जखमी केले. तसेच कारचे नुकसान केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.