Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 9:00 am

MPC news

Chikhali : बॅगचा धक्‍का फळांच्‍या क्रेटला लागल्‍याच्‍या कारणावरून डिलिव्‍हरी बॉयला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकीला अडकविलेल्‍या बॅगचा धक्‍का फळांच्‍या क्रेटला लागल्‍याच्‍या कारणावरून (Chikhali)डिलिव्‍हरी बॉयला मारहाण करण्‍यात आली. याप्रकरणी चौघांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेनऊ वाजताच्‍या सुमारास नेवाळे वस्‍ती, चिखली येथे घडली.

अजय संजय भोसले (वय 24, रा. झेंडा चौक, मोरेवस्‍ती, चिखली) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या तरुणचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी याबाबत चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. संतोष निवृत्‍ती शिंदे व कल्‍पेश संतोष शिंदे (दोघेही रा. नेवाळे वस्‍ती, चिखली) व त्‍यांचे दाेन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Maval : कार्ला-मळवली दरम्यानच्या पुलावरून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी अजय हे डिलिव्‍हरी बॉयचे काम करतात. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी अजय हे आपल्‍या दुचाकीवरून चालले होते. त्‍यावेळी त्‍यांच्‍या दुचाकीला अडकविलेल्‍या बॅगचा धक्‍का आरोपी शिंदे यांच्‍या फळांच्‍या क्रेटला लागला. त्‍यामुळे आरोपी संतोष शिंदे याने शिवीगाळ करीत अजय यांना मारहाण केली. यामुळे अजय यांनी आपले सासरे नाना मरिभाऊ मुरगुंड यांना फोन करून बोलविले. त्‍यांच्‍यासोबत गणेश शिरोळे हे देखील आले. त्‍यांनी संतोष शिंदे यांना शिवीगाळीचा जाब विचारल्‍यामुळे संतापलेल्‍या संतोष शिंदे, कल्‍पेश शिंदे व इतर दोघांनी लाकडी दांडक्‍याने त्‍या तिघांना मारहाण करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर