Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 8:02 am

MPC news

Chinchwad : सांगवीतील घुटे टोळी, देहूरोड येथील मगर टोळी, तळेगाव दाभाडे येथील खराडे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगवी येथील घुटे टोळी, (Chinchwad)देहूरोड येथील मगर टोळी आणि तळेगाव दाभाडे येथील खराडे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई केली आहे. चालू वर्षात पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सहा महिन्यात 21 टोळ्यांमधील 130 गुन्हेगारांना मोकाचा डोस दिला आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख सौरभ ऊर्फ राजकुमार गोकुळ घुटे (वय 23, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी), सुजल राजेंद्र गिल (वय 19, रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव), अमन राजेंद्र गिल (वय 18, रा. गांगर्डनगर, पिपंळे गुरव), अब्दुल अजीज उर्फ पापा अलीम अख्तर आगा (वय 24, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी), जितेश ऊर्फ मुन्ना रविंद्र जगताप (वय 30, रा. गांगर्डेनगर, नवी सांगवी), अजय ऊर्फ बारक्या यशवंत सावंत (वय 24, रा. शेळकेवाडी, घोटावडे, ता. मुळशी), मयुर नितीन अवचरे (वय 26, रा. जुनी सांगवी), अक्षय रामदास टेकाळे (वय 20, रा. गांगर्डनगर, पिंपळे गुरव), अविनाश पातीराज डिमेंटी (वय 31, रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरुध्द 20 गुन्हे केल्याची नोंद आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय 25, रा. राहुलनगर ओटास्किम, निगडी), अनुराग संतोष विधाते (वय 19, रा. जुना जकात नाका, चिंचवड), आदित्य गोरख दुनघव (वय 20, रा. ओटास्किम, निगडी), कृष्णा उर्फ बाळा झुंबर पुलावळे (वय 24, रा. त्रिवेणीनगर, निगडी), प्रणव उर्फ पन्या गौराण्णा अर्जुन (वय 19, रा. ओटास्किम, निगडी), अमित उर्फ मुन्ना संतोष नाईक (वय 24, रा. काळभोर चाळ, निगडी), तुषार अनिल चव्हाण (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), जाकीर कय्युम पठाण (वय 23, रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी), जेसन जॉन डिकोना (वय 24, रा. ओटास्कीम, निगडी), रफीक सलीम खान (वय 36, रा. ओटास्किम, निगडी), आनंद ऊर्फ दाद्या राजु गवळी (वय 21, रा. ओटास्किम, निगडी), गणेश ऊर्फ संदिप बाळासाहेब मतकर (वय 23, रा. रुपीनगर, तळवडे), सुरज कैलास उराव (वय 19, रा. ओटास्किम, निगडी), सागर रामदास जाधव (वय 24, रा. ओटास्कीम निगडी) आणि एक विधीसंर्घर्षित बालक यांच्या विरुध्द एकूण 26 गुन्हे केल्याची नोंद आहे.

Pune : ज्येष्ठ छायाचित्रकार रूपसिंग यांचे निधन

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख विकी ऊर्फ विवेक राजेश खराडे (वय 19, रा. कामाठीपुरा, शिक्रापूर, ता. शिरुर), निरज बापु पवार (वय 18, रा. नेहरुनगर, पिंपरी), आदित्य नितीन भोईनल्लू (वय 20, रा. कामाठीपुरा, शिक्रापूर, ता. शिरुर), रोहन ऊर्फ चिक्या उत्तम शिंदे (वय 18, रा. कातवी रोड, तळेगाव दाभाडे), आर्यन विनोद पवार (19, रा. बावधन, ता. मुळशी), ओम संदीप घाटे (वय 21, रा. वडगाव शेरी, ता. हवेली), पांडुरंग बालाजी कांबळे (वय 23, रा. शिरुर, ता. शिरुर), एक अनोळखी इसम यांच्या विरुध्द एकूण आठ गुन्हे केल्याची नोंद आहे.

वरील तिन्ही टोळी प्रमुखांनी स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने स्वतःचे आणि गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून पिंपरी, वाकड, चिखली, निगडी, रांजणगांव पोलीस स्टेशन हद्दीत खून, घातक हत्यारे जवळ बाळगून दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न करणे, दरोड, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, कट रचणे, तोडफोड करणे, विनयभंग करणे, बेकायदेशिर अग्निशस्त्रे व हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीर स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे केले आहेत. संघटीतपणे गुन्हे केल्यामुळे त्यांच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारित केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्श्रीठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, शत्रुघ्न माळी, अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस अंमलदार श्री सोनटक्के, ओंकार बंड, श्री कौटेकर, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली आहे.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर