Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 10:14 am

MPC news

Cricket : भारताच्या यंग ब्रिगेडनं पराभवाचा वचपा काढला, पाच T-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी

एमपीसी न्यूज-  भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका हरारे येथे चालू असून  भारताला पहिल्या टी 20 मॅचमध्ये 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. फलंदाज आणि गोलंदाजांच्या आकर्षक कामगिरीच्या जोरावर  भारतानं दुसऱ्या टी 20 सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी केली (Cricket)आहे. 

भारतानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून शुभमन गिल आज चांगली कामगिरी करु शकला नाही. तो केवळ 2 धावा करुन बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडनं 137 धावांची भक्कम अशी भागिदारी केली. अभिषेक शर्मानं 47 धावांमध्ये 100, ऋतुराज गायकवाड 77 तर रिंकू सिंगनं 48 धावा केल्या. या त्रिकुटांच्या जोरावर भारतानं 234 धावांचा भव्य डोंगर(Cricket) रचला.

Dehu : व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांनी स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे – सारिका शेळके

भारताने केलेल्या 234 धावसंख्येचा पाठलाग करण्यात झिम्बॉब्वेला साफ अपयशाचा सामना करावा लागला.वेस्ली मधेवेरे,ब्रायन बेनेट, ल्यूक जोंगवे या तिघांशिवाय इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात आली नाही. मधेवेरेनं 43 धावा , ब्रायनं बेनेटनं 26  धावा केल्या आणि ल्यूक जोंगवेनं 33 धावा केल्या.भारताकडून गोलंदाजी करणाऱ्या आवेश खान यानं 3 तर मुकेश कुमार आणि रवि बिष्णोईनं झिम्बॉब्वेच्या दोन विकेट घेतल्या.

 

 

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर