एमपीसी न्यूज – फरशी काढत असल्याच्या रागातून(Dighi) तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री नऊ वाजता कोतवालवाडी, चऱ्होली येथे घडली.
इसाक इब्राहीम मुजावर (वय 55, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाम पंडित तपकीर (वय 45), एक महिला आणि सिद्धेश शाम तपकीर (वय 22, सर्व रा. कोतवालवाडी, चऱ्होली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chinchwad : सांगवीतील घुटे टोळी, देहूरोड येथील मगर टोळी, तळेगाव दाभाडे येथील खराडे टोळीवर मोका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुजावर यांच्या मालकीच्या गाळ्याच्या मागील बाजूला असलेल्या जागेत बसवलेली फरशी मुजावर आणि त्यांचा मुलगा काढत होते. त्यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शाम तपकीर याने फरशीने फिर्यादीस मारून जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.