Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 7:18 pm

MPC news

Accident : पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; 2 ठार आणि 15 जखमी

एमपीसी न्यूज- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या सत्रात वाढ झालेली दिसून येत आहे.  एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं ब्रीद घेऊन लालपरी रस्त्यावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावते. मात्र, गेल्या काही दिवसांत एसटी बसेसच्यसुद्धा अपघातांच्या घटना घडत आहेत. अनेकदा बसची झालेली दूरवस्था या अपघाताला कारणीभूत असल्याचे असे  एसटीच्या कर्मचारी आणि प्रवासी तसेच नागरिक सांगत असतात. आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, 2 जण ठार झाले असून 15 प्रवासी जखमी(Accident) आहेत.

Chikhali : कुरिअर कंपनीचे कार्यालय फोडून रोख रकमेसह कुरिअरचे पार्सलही लंपास

जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरच्या नजदीक कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने  कारमधील दोघांचा (Accident)जागीच मृत्यु झाला असून एसटी बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची  माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस व प्रशासनाला सूचना केल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. अपघातातील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात झालेली एसटी बस पारनेरवरुन मुंबईकडे तर, कार आळेफाट्याकडे जात असताना ओतुरजवळ हा अपघात झाला. बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा आणि ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर