एमपीसी न्यूज – ज्येष्ठ छायाचित्रकार रूपसिंग सिंग (वय 73) यांचे(Pune) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सोमवारी (दि. 8) सकाळी साडेअकरा वाजता ख्रिश्चन दफनभूमी, दापोडी येथे होणार आहे.
रूपसिंग यांनी सुरुवातीच्या काळात पिंपरी-चिंचवड शहरात आणि त्यानंतर पुणे शहरात माध्यम संस्थांमध्ये छायाचित्रकार म्हणून काम केले. ते साध्य कलवड वस्ती, लोहगाव येथे वास्तव्यास होते. त्यांच्या मागे तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
Chakan: चाकण मध्ये दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी ;महामार्ग व अंतर्गत रस्ते ‘ओव्हर फ्लो’
रूपसिंग हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होत होते. ते प्रार्थना भवन कलवड पुणे या संस्थेचे ते अध्यक्ष होते.