एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. (Today’s Horoscope 7July 2024)
आजचा दिवस – रविवार.
तारीख – 07.07.2024.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – पुष्य.
चंद्र राशी – कर्क.
————————
मेष- ( शुभ रंग- भगवा)
आज संमिश्र फळे देणारा दिवस. बेरोजगारांना घराजवळ रोजगाराच्या संधी येतील. वास्तू, वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. कलावंतांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.
वृषभ (शुभ रंग- जांभळा)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बरीच धावपळ होईल. प्रॉपर्टी, शेतीवाडी खरेदी विक्रीच्या कामात अडथळे येतील. आज प्रलोभनांपासून लांब राहा. वादविवाद टाळा.
मिथुन (शुभ रंग – निळा)
आज कार्यक्षेत्रातील काही अनुकूल घटना तुमच्या आत्मविश्वासात भर टाकतील. पैशाअभावी बराच काळ रखडलेले उपक्रम मार्गी लावता येतील. अशादायी दिवस.
कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे आहे. अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीची ही काळजी घेणे आवश्यक आहे. गोड बोलून बरेच अवघड प्रश्न सुटतील.
सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)
तुमची तब्येत थोडी नरमच असली तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. महत्त्वाच्या कामासाठी केलेले प्रवास कार्य साधक ठरतील. अनावश्यक खर्च टाळायला हवेत.
कन्या (शुभ रंग- चंदेरी)
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. नेत्यांची भाषणे प्रभावी होतील.
तूळ (शुभ रंग- चंदेरी)
महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. कोणतेही गैरव्यवहार करू नका. आज नीती बाह्य वर्तन अंगाशी येऊ शकते. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या.
वृश्चिक ( शुभ रंग- राखाडी)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. व्यक्तिमत्व विकास साधाल.
धनु (शुभ रंग- सोनेरी)
हीतशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध असावे. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
मकर (शुभ रंग- मोतिया)
व्यवसायातील तीव्र स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल. आज वैवाहिक जीवनातील लज्जत वाढेल. आज पत्नीकडे मन मोकळे करताना मात्र हातचे राखूनच बोला.
कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी आज इतरांच्या भानगडीत न पडता बिनचूक कामास प्राधान्य द्यायला हवे. आज काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. संयम गरजेच राहील.
मीन (शुभ रंग- मरून )
आज तुमचा उत्साह व कार्यक्षमता चांगली असेल. कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. प्रेम प्रकरणांना थोरा मोठ्यां कडून ग्रीन सिग्नल मिळेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424