एमपीसी न्यूज – हॉकी पुणे लीगमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात सोमवारी क्रीडा प्रबोधिनी संघ अपराजित राहिला.फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पुणेकडून मनप्रीत सिंग तर फ्रेंड्स युनियन क्लबने ओंकार मुसळेच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बाजी मारली. हॉकी लव्हर्स अकॅडमीने 7-5 असा विजय(Hockey) मिळवला.
मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या लीगमध्ये वरिष्ठ विभागात सहज विजय नोंदवले गेले. पहिल्या सामन्यात, क्रीडा प्रबोधिनीने रोहन पाटील (18वे-पीसी, 51वे – पीसी) आणि धैर्यशील जाधव (37 वे, 53 वे) यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर जीएसटी अँड कस्टम्स, पुणे संघाचा 7-2 असा पराभव केला. विजयी संघाकडून उर्वरित दोन गोल हर्ष शेंडगी (28 वे), व्यंकटेश केंचे (31 वे) आणि सचिन राजगडे यांनी (39 वे) केले. जीएसटी अँड कस्टमसाठी रोहन पिल्ले (12 वा) आणि तालेब शाह (47 वा) गोल केले.
विजयाचा शिल्पकार मनप्रीत सिंग (10 वा, 12 वा, 27 वा -पीसी; 30 वा) हॅट्ट्रिकमुळे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पुणे संघाने इन्कम टॅक्स, पुणे संघाला 7-1 अशा फरकाने हरवले. एफसीआयसाठी राज पाटील (33 वे), भीम बटाला (44 वे) आणि अजय नायडू (45 वे पीसी) यांनीही गोल केले. इन्कम टॅक्स, पुणेकडून एकमेव गोल अजितेश रॉयने (42 वा) पेनल्टी स्ट्रोकद्वारे(Hockey) केला.
ज्युनियर विभागात अभिजीत जगतापने (2 रे पीसी) फ्रेंड्स युनियन क्लबला आघाडी मिळवून दिली. मात्र, ओंकार मुसळेने (23 वे p.c.) हॉकी लव्हर्स अकॅडमीला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
शुभम ठाकूरने (25 वे-पीसी) फ्रेंड्स युनियनला पुन्हा (2-1) आघाडीवर नेले. परंतु, रोहन मुसळेने (28 वे आणि 30 वे) दोन मिनिटांच्या फरकाने दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करत हॉकी लव्हर्सला (3-2) आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात, कुणाल जगदाळेने (33 वे) 3-3 बरोबरी साधली तरी ओंकारने (38 वे – पीसी) हॉकी लव्हर्स अकॅडमीची आघाडी4-3 अशी वाढवली. दुसरीकडे , पिछाडीवर पडलेल्या फ्रेंड्स युनियनने चार गोल करत (कुणाल जगदाळे (45 वे), रेहान शेख (36 वे); शुभम ठाकूर (47 व्या) आणि त्याच मिनिटाला यश ठाकूर (47 व्या) प्रतिस्पर्धी संघावर 7-4 अशी आघाडी घेतली. समीर शेखने (54 व्या) एक गोल केला तर फ्रेंड्स युनियन क्लबने 7-5 असा सामना जिंकला.
निकाल:
वरिष्ठ विभाग –
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पुणे: 7 (मनप्रीत सिंग 10 वे, 12 वे, 27 वे पीसी; 30 वे; राज पाटील 33 वे; भीम बटाला 44 वे; अजय नायडू 45 वे पीसी) आयकर, पुणे: 1 (अजितेश रॉय 42 वे पेनल्टी स्ट्रोक). हाफ टाईम: 4-0
क्रीडा प्रबोधिनी: 7 (रोहन पाटील 18 वे पीसी., 51 वे पीसी; हर्ष शेंडगी 28वे; व्यंकटेश केंचे 31 वे; धैर्यशील जाधव 37 वे, 53 वे; सचिन राजगडे 39 वे) विजयी वि. जीएसटी अँड आणि कस्टम, पुणे: 2 (रोहन पिल्ले.12 वे; तलेब शाह 47 वे). हाफ टाईम: 1-1
कनिष्ठ विभाग
अ गट: फ्रेंड्स युनियन क्लब: 7 (अभिजीत जगताप 2रा पीसी; शुभम ठाकूर 25 वा पीसी; कुणाल जगदाळे 33 वा, 45 वा, रेहान शेख 36 वा; शुभम ठाकूर 47 वा; यश ठाकूर 47 वा) विजयी वि. हॉकी लव्हर्स अकॅडमी:5( ओंकार मुसळे 23 वा, 28 वा पीसी, 30 वा पीसी, 38 वा पीसी; समीर शेख 54 वा). हाफ टाईम: 2-3