एमपीसी न्यूज – लोणावळा येथील टायगर पॉईंटवर असलेल्या(Lonavala) एका स्नॅक्स सेंटर मध्ये हुक्का विक्री सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) सायंकाळी करण्यात आली.
मंगेश नंदू कराळे (वय 25, रा. खंडाळा, ता. मावळ), राकेश गणपत वारे (वय 25, रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वनरक्षक वेदिका शीर्षे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आवतण गावच्या हद्दीत टायगर पॉईंट आहे. तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्याच ठिकाणी आरोपींचे स्नॅक्स सेंटर आहे. तिथे येणाऱ्या पर्यटकांना विकण्यासाठी आरोपींनी त्यांच्या सेंटर मध्ये हुक्का ठेवला.
Mumbai : मुंबईत अतिमुसळधार पाऊस; मंत्रालयासह सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना दुपारीच सुट्टी
याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये हुक्का फ्लेवर आणि हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्या पोलिसांनी जप्त केले आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनविभागाकडून याप्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.